घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 15 आमदारांच्या निलंबनाची शक्यता!

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 15 आमदारांच्या निलंबनाची शक्यता!

Subscribe

मुंबई : विधानसभेतील शिंदे सरकारच्या बहुमताच्या चाचणीत पक्षादेशाचे पालन न केल्याबद्दल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या 15 आमदारांनावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्याबाबतचे पत्र दिले आहे.

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. काल पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड घेण्यात आली. त्यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने परस्परविरोधी व्हिप जारी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे राजन साळवी यांना मतदान करण्याचे निर्देश शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिले होते. तर, भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे निर्देश शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा – सर्वगुणसंपन्न शिंदेंसारख्या नेत्याला एकच खातं का दिलं? अजित पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

हे मतदान झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्य़क्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांकडून व्हिपचे पालन झाले नसल्याची नोंद रेकॉर्डवर आणली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड कायम ठेवली. अशा प्रकारे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी परस्पर भूमिका घेतली.

- Advertisement -

त्यानंतर आजही शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीच्या वेळी याचीच पुनरावृत्ती झाली. भरत गोगावले यांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा व्हिप बजावलेला असतानाही शिवसेनेच्या 15 आमदारांनी त्याविरोधात मतदान केले. त्यामुळे तशे पत्र भरत गोगावले यांनी दिले आहे.

संतोष बांगर शिंदे गटात
हिंगोलीतील शिवसेना आमदार संतोष बांगर हे बहुमत चाचणीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतदान केले होते. तर, आज शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले.

हेही वाचा – शिवसेनेला संपवण्यासाठी शिंदेंना लढवतायत, शिवसेना रक्तपात होऊन संपेल – भास्कर जाधव

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -