दिशा नाही तर, आदित्य ठाकरेंवर भाळली ‘ही’ अभिनेत्री, पोस्टची सर्वत्र चर्चा

सध्या आदित्य ठाकरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'या' अभिनेत्रीने केलेली कमेंट चर्चेत आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात सत्तांतर सुद्धा झाले. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासारख्या अनेक घटना घडामोडींनी राज्यात वेग धरला. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या खात्याची जबाबदारी सांभाळत आदित्य ठाकरे सोशल मीडियावर सुद्धा त्या संदर्भात माहिती देत असतात.

आणखी वाचा – शिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

आणखी वाचा – शिवसेनेच्या १६ आमदारांचे सदस्यत्व धोक्यात, व्हिपवरून शिंदे गट निर्णयाच्या तयारीत

सध्या आदित्य ठाकरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यांची ही पोस्ट व्हायरल होण्यामागे देखील कारणंही तसेच आहे. आदित्य ठाकरे यांच्या पोस्ट वर एका अभिनेत्रीने कमेंट केली आहे. तुम्हाला ही हेच वाटलं असेल ही अभिनेत्री दिशा पटानी(disha patani) असेल, पण तसे नाही ही अभिनेत्री दिशा पाटनी नसून दुसरीच आहे.

आणखी वाचा – Aditya Thackeray : शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष, आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची घोषणा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditya Thackeray (@adityathackeray)

आणखी वाचा –

आदित्य ठाकरे(aditya thackeray) यांनी त्यांचे वडील उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचा एक फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आणि आणि त्याला समर्पक असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. ”नेहमी योग्य योग्य व्यक्तीचा आदर्श घेणं फार महत्वाचं असतं. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे. तुमचं प्रेम हीच आमची खरी ताकद आहे.” असं आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा –  Aditya Thackeray : अयोध्येपूर्वी आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा, राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता

आणखी वाचा –  बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करत आहेत आणि लाईक सुद्धा करत आहेत. पण यातच एका अभिनेत्रीने केलेली कमेंट सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. ‘या’ अभिनेत्रीने आदित्य ठाकरे यांच्या पोस्ट वर ५ हार्ट असलेले इमोजी कमेंट यामध्ये लिहिले आहेत. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे. सुरुवातीला ही अभिनेत्री दिशा पाटनी असेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण ही अभिनेत्री दिशा पाटनी नसून ‘अहाना कुमरा’ आहे. ‘अहाना कुमरा’ ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. ‘अहाना कुमरा’ ने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘युद्ध’ मध्ये तर अभिनेता शरद केळकर सोबत ‘एजंट राघव- क्राईम ब्रॅंच’ मालिकेत है काम केले आहे. आणि या पोस्ट आणि कमेंटचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा –  बंडखोर आमदारांना डोळ्यात डोळे घालून बोलावेच लागणार; आदित्य ठाकरेंचा इशारा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.