राज्यात 24 तासांत 1800 कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईत रुग्णांच्या संख्येत वाढ

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 24 तासांत 1800 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2182 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात एकूण 11370 सक्रिय रुग्ण संख्या आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर २४ तासांत राज्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5194 इतके रुग्ण असून त्यानंतर पुण्यामध्ये 1630 सक्रिय रुग्ण आहेत.

मंगळवारी राज्यात 836 रुग्णांची नोंद झाली असून 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. राज्यातील मीरा भाईंदर, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दुसरीकडे, देशातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 9062 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर काल 8813 कोरोना रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 15,220 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. भारतात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,05,058 आहे. तर सक्रिय प्रकरणं 0.24 टक्के इतके आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत.


हेही वाचा : मुंबईकरांचा प्रवास गारेगार, बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर एसी इलेक्ट्रिक बसगाड्या