घरमहाराष्ट्रदेशात दरवर्षी रेबीजमुळे ३० हजार लोकांचा मृत्यू

देशात दरवर्षी रेबीजमुळे ३० हजार लोकांचा मृत्यू

Subscribe

मुंबईसह देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाचे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे.

मुंबई : मुंबईसह देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाचे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष व धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते, अशी धक्कादायक माहिती २८ सप्टेंबर या जागतिक रेबीज दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून उपलब्ध झाली आहे. (30 thousand people die every year due to rabies in the country)

भटकी कुत्री व मानवांमध्ये केवळ आंशिक लसीकरण हा रोगाचा प्रमुख जोखीम घटक मानला जातो. या अनुषंगाने कुत्र्यांचे संख्या नियंत्रण आणि कुत्र्यांचे सक्तीचे लसीकरण यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे असल्याचे मत मुंबई महापालिकेने व्यक्त केले आहे.

- Advertisement -

दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘जागतिक रेबीज दिन’ म्हणून पाळण्यात येतो. मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधांसह आरोग्य सुविधा देणा-या मुंबई महापालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही भटक्या कुत्र्यांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

पालिकेतर्फे यंदा ५ हजार भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका विविध प्राणिप्रेमी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशु वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे.

- Advertisement -

रेबीज हा संसर्गजन्य रोग

रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग विशेषतः कुत्रे व मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येतो. हा रोग देशातील मृत्यू आणि विकृतीच्या प्रमुख कारणांपैकी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून हा रोग निश्चितपणे ओळखला जातो, अशी माहिती डॉ.पठाण यांनी दिली.

रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक

ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. तरी ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशु वैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य द्यावी, असेही डॉ. पठाण यांनी आवर्जून नमूद केले आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी ९ ऑक्टोबरपर्यंत लसीकरण मोहीम

मुंबई महापालिकेकडून मुंबईत भटक्या कुत्र्यांसाठी ९ ऑक्टोबरपर्यंत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये २० पशुवैद्यक सहभागी होणार आहेत. तसेच ज्या भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाणार आहे, त्या कुत्र्यांना विशिष्ट रंगाने चिन्हांकित केले जाणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणारी पहिल्या टप्प्यातील ही मोहीम प्रायोगिक असून त्यानंतर निरंतर पद्धतीने ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे, असेही पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.


हेही वाचा – बुलडोझरच्या वादाचे अमेरिकेतील परेडमध्ये पडसाद; आयोजकांनी मागितली माफी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -