घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये कचरा वेचताना सापडली ४३ जिवंत काडतुसे

पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा वेचताना सापडली ४३ जिवंत काडतुसे

Subscribe

पिंपरी-चिंचवड परिसरातील एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिजखाली ४३ जिवंत काडतुसे सापडली असून याप्रकरणी पोलिसांनी जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरातील एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिजखालील रेल्वे लाईनच्या कडेला एका लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये ४३ जिवंत काडतुसे कचरा वेचक महिलेला सापडली असून याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित जिवंत काडतुसे ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २१ नोव्हेंबरच्या रात्री सातच्या सुमारास एका ५८ वर्षीय कचरा वेचक महिलेला कचरा गोळा करत असताना एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिजखालील रेल्वे लाईनच्या कडेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. यामुळे महिला घाबरली होती. यासंबंधी महिलेने पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली.

काडतूसांवर इंग्रजी नावं

पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास असता पिशवीमध्ये एकूण ३०३ चे २६ जिवंत काडतुसे असून त्यावर इंग्रजीमध्ये KF ९९ असे लिहिलेले आढळले. तर १० नग सिल्व्हर रंगाचे बाराबोर २.२ त्यावर इंग्रजीमध्ये MADE IN BELGIUM १२ असे लिहिलेले पाहायला मिळाले. ०७ नग लाल रंगाचे बाराबोर त्यावर इंग्रजीमध्ये WESTERN SUPER NO १२, MADE IN USA असे लिहिलेले असे एकूण ४३ जिवंत काडतुसे महिलेला सापडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सर्व काडतुसे पिंपरी पोलिसांनी जप्त केली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

पिस्तुल विक्रेता पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलायाच्या गुन्हे शाखाने देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी हे जिवंत काडतुसे रेल्वे लाईनच्या कडेला टाकली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -