Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र पोलीस कोठडीत मारहाण न करण्यासाठी मागितले 50 हजार; एपीआय अन् शिपाई ताब्यात

पोलीस कोठडीत मारहाण न करण्यासाठी मागितले 50 हजार; एपीआय अन् शिपाई ताब्यात

Subscribe

नाशिक : येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मारहाण करणार नाही अणि कलम वाढवण्याची भीती दाखवून ५० हजार रुपये लाचेची (bribe) मागणी करणार्‍या सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या (Nashik ACB) पथकाने मंगळवारी (दि.२२) अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलीस शिपाई सतीश बागूल अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

सपकाळे व बागूल यांची येवला शहर पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. विशेष म्हणजे, सपकाळे हे महिन्यापूर्वीच येथे रुजू झाले होते. तक्रारदार यांच्या भावाच्या नावावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात भावाला पोलीस कोठडीमध्ये मारहाण करणार नाही, या गुन्ह्यात ३०७ वाढीव कलम लावण्याची भीती घालून सपकाळे व बागूल यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

सपकाळे यांनी तक्रारदारांच्या घरी जाऊन त्यांचा जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेतला. सपकाळे यांनी तक्रारदारांच्या मोबाईलमधील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली. याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने पडतळणी करुन सपकाळे व पोलीस शिपाई बागूल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विश्वजीत जाधव, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस अंमलदार प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, नितीन कराड, परसराम जाधव यांच्या पथकाने केली.

लाच स्विकारणे हा गुन्हा आहे. कायदेशीर कामांसाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. तक्रारदारांनी 1064 क्रमांकावर किंवा नाशिक कार्यालयात संपर्क साधून तक्रार करावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल. : शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

हेही वाचा : ACB Report : लाचखोरीत राज्यात नाशिक अव्वल; 8 महिन्यांत 104 गुन्ह्यांत 153 लाचखोर जाळ्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -