घरमहाराष्ट्रअकोल्यात 100 वर्ष जुनं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 40 जखमी

अकोल्यात 100 वर्ष जुनं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 40 जखमी

Subscribe

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 35 ते 40जण जखमी झाले असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड पडल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत 35 ते 40जण जखमी झाले असून त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंदिरामध्ये आरती सुरु असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 100 वर्षे जुनं झाड अचानक कोसळलं. त्यात सता जणांना जीवाला मुकावं लागलं. या घटनेमुळे अकोल्यात एकच खळबळ उडली आहे. ( 7 people died and 40 injured in Akola tree fell on tin shed in Temple know in details  )

बाबूजी महाराज मंदिरात रविवारी रात्री आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दररोज होणाऱ्या या आरतीला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आरती सुरु असतानाचा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. त्यामुळे मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले 100 वर्षे जुने लिंबाचे झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळले. झाड कोसळल्याने संपूर्ण शेड खाली आली आणि त्यात अनेकजण दबले गेले. आतापर्यंत टिनच्या शेडखालून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार, तसेच, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर करण्यात आल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

दुर्घटनेत 40 जण जखमी

शेडखालून 35 ते 40 जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी काहींना किरकोळ मार लागला होता. त्यांच्यावर उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. तर 29 जणांना प्रचंड मार लागला असून त्यांच्यावर अकोल्याच्या मेडिकल काॅलेजमध्ये उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंदिर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. रात्रभर आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं काम सुरु होतं. काहींनी रुग्णालयात जाऊन आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. रात्रभर मंदिर परिसरात आक्रोश आणि रडारड सुरु होती.

( हेही वाचा: फोटो : शरयूतीरी आरती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट )

अनेक राज्यांच तापमान 38 ते 40 अंशांवर

उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढ झाल्याने उष्माही वाढला आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्य़े कमला तापमान 38 ते 40 अंशांच्या आसपास नोंदवलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -