Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाने एक दिवसांच्या जुळ्यांचे मातृत्व हिरावलं, बाळांना कुशीत घेण्याआधीच मुलं पोरकी...

कोरोनाने एक दिवसांच्या जुळ्यांचे मातृत्व हिरावलं, बाळांना कुशीत घेण्याआधीच मुलं पोरकी…

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव इतका वाढत आहे की अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. अवघ्या २४ तासांत जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. काल (सोमवारी) जुळ्या बाळांना जन्म दिला आणि आज त्या मातेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने या दोन्ही जुळ्या बाळांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली आहे.

४ एप्रिलला या महिलेला खूप त्रास होऊ लागला. तसेच महिलेची प्रसुतीची तारिख देखील जवळ आली होती. त्यामुळे महिलेला पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची ऑक्सीजन पातळी कमी असल्यामुळे तिची अँटीजेन चाचणी केली. त्यावेळी तिची अँटीजेन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. ५ एप्रिलला महिलेचे सिझरिंग करण्यात आले. तिने दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला. परंतु त्या बाळांना कुशीत घेण्याच्या आधीच महिलेची प्रकृती आणखीन खालावली आणि तिचा अखेर मृत्यू झाला.

- Advertisement -

सुदैवाने दोन्ही बाळांची प्रकृती आता सुधारलेली आहे. काल त्यांना जन्मल्यानंतर ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते. परंतु आज सकाळी त्यांचे ऑक्सीजन काढण्यात आले. या बाळांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. पण अजूनही आरटीपीसीआरचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत. पण या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: सोलापुरातील काही भागांमध्ये कोरोना लसीचे संपले डोस


- Advertisement -

 

- Advertisement -