घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देत रिक्षाचालाकाचा महिलेवर बलात्कार

अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देत रिक्षाचालाकाचा महिलेवर बलात्कार

Subscribe

नाशिक : अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी दाखवत रिक्षाचालकाने २३ डिसेंबर २०२१ ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी वसीम नासीर शेख (वय ३८, रा. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व संशयित आरोपी वसीम शेख एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित महिलेचा शालिमार परिसरात ज्युस सेंटर आहे. या ठिकाणी ती सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ज्युस विक्रीचा व्यवसाय करते. संशयित आरोपी वसीम शेख हा रिक्षाचालक असून, तो शालिमार परिसरात आला की पीडित महिलेला भेटायचा. त्यातून त्याने महिलेशी ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. वसीने तिचा विश्वास संपादन केला. त्यातून त्याने विवाहित असलेले न सांगता तिला मैत्रीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यास नेत प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

- Advertisement -

मूळचा संभाजीनगर (औ.बाद) येथील असलेल्या वासीमने महिलेवर बी. डी. भालेकर मैदान परिसरात बलात्कार केला. त्यावेळी त्याने चाकूचा धाक दाखवत मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढले. त्या फोटोंआधारे त्याने धमकावत मुंबई नाका परिसरात वारंवार बलात्कार केला. तसेच, पीडित महिला बोरगड परिसरात मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेली असता त्या ठिकाणी येत संशयित आरोपीने तिला मारहाण करत गर्भपात केला. त्यानंतरही तिच्यावर रिक्षात बलात्कार केला. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. आहिरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -