घरमहाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रातील लेकीबाळीकडे बघण्याची दृष्टी...; शिरसाट यांच्या ‘त्या’ विधानावर सुषमा अंधारेंचे जोरदार प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील लेकीबाळीकडे बघण्याची दृष्टी…; शिरसाट यांच्या ‘त्या’ विधानावर सुषमा अंधारेंचे जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

पुणे : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. याला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, शिरसाट यांच्या वक्तव्याने त्यांचा लेकीबाळींकडे बघण्याचा दृष्टीकोण सर्वांसमोर आला. त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचा त्यांनी पुरावा दिला आहे.

हेही वाचा – लोकांचा छळ करणं हे आमचं हिंदुत्त्व नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करताना म्हटले की, संजय शिरसाटानी माझ्याबद्दल काहितरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. त्यामुळे इतरांच्या लेकीबाळी कडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. पण सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील पारमिता नाही ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असु शकते का असा प्रश्न उरतोच.. उलटपक्षी सिर्साटच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला.. म्हणुनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतः ची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन, असा खोचक टोला सुषमा अंधारेंनी शिरसाटांना लगावला.

- Advertisement -

शिरसाट काय म्हणाले होते?
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या शब्दात टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. शिरसाट म्हणाले की, ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. पण आता कोणीही सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असा टोला त्यांनी लगावला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अंधारे यांच्याबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केली. दानवे यांनी मला फोन करून सांगितले की, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.

हेही वाचा – मिंध्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढणार का? हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे…

खंदे समर्थक सोडून गेल्याचा पश्चात्ताप व्यक्त करा
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या मालेगावच्या सभेवरही टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे महाविकास आघाडीचा मेळावा वाटत होता. ही सभा उद्धव ठाकरेंच्या नावावर असली तरी हिंदुत्वाची सभा वाटली नाही. उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये केलेले वक्तव्य एकदा तपासून पाहावे काराण आम्ही कुणाचेही काही चोरलेले नाही. आम्ही नेहमी आमची नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. कारण माणसे आणि विचार चोरले जाऊ शकत नाही.
उद्धव ठाकरेच्या बाजूला आज जे लोक आहेत ते शिवसेनेसोबत कधीच नव्हते. शिवसेना सोडून गेलेल्या लोकांनी 40-45 वर्षे काम केले आहे, असे शिरसाट म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून नक्कीच काही चूक झाली असणार त्यामुळे बाळासाहेबांचे खंदे समर्थक त्यांना सोडून गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी याचा विचार करून पश्चाताप व्यक्त केला पाहिजे, असेही शिरसाट म्हणाले.

हेही वाचा – हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -