घरमहाराष्ट्रपुणेधक्कादायक: माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने तीन कोटींची खंडणी; 'असा' केला...

धक्कादायक: माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने तीन कोटींची खंडणी; ‘असा’ केला प्लॅन

Subscribe

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने यांचे नाव वापरुन दोघाजणांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन दोघाजणांनी व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी करणा-या दोघांनी केली आहे. याप्रकरणी राजेश व्यास यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संदीप पीरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे ( वय 35, रा भालेकर चाळ कर्वे नागर पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर काॅल मी नावाचे एक अॅप डाऊनलोड करुन त्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवण्यात आले की, खरंच मोहोळ यांचाच हा नंबर आहे. तसेच, आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाच्या नंबरचादेखील गैरवापर केला आहे.

‘असा’ आखला प्लॅन

हा प्रकार 25 मार्च रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे मावस भाऊ रवी आटोळे या दोघांचे मोबाईल आरोपींनी हॅक केले.

- Advertisement -

पौड रस्त्यावर फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या मावसभावाच्या नावाचा वापर करुन त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 3 कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशा धमकी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

( हेही वाचा: अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचा असाही सहभाग, गृर्भगृहापासून मुख्यप्रवेशद्वारासाठी ‘या’ भागातून जाणार सागवान लाकूड )

आरोपींनी ही खंडणी मागण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -