घरमहाराष्ट्रउदय सामंत राज्यातील फेल्युअर उद्योगमंत्री, आदित्य ठाकरेंची टीका

उदय सामंत राज्यातील फेल्युअर उद्योगमंत्री, आदित्य ठाकरेंची टीका

Subscribe

उदय सामंत हे राज्यातील फेल्युअर उद्योगमंत्री आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील माहिम किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता, त्यांनी उदय सामंत यांच्यावर घणाघात केला.

एकीकडे राज्यातील काही मोठे उद्योग राज्याच्या बाहेर जात आहे, तर रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. पण राज्यातून बाहेर जाण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. उदय सामंत हे राज्यातील फेल्युअर उद्योगमंत्री आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील माहिम किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले होते, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता, त्यांनी उदय सामंत यांच्यावर घणाघात केला.

हेही वाचा – बारसूतील आंदोलन तूर्तास स्थगित; मार्ग काढण्यासाठी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम

- Advertisement -

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात दोन बाजू सुरू आहेत. एका बाजूला राज्यातील उद्योग राज्याच्या बाहेर जात आहेत. Pou Chen नामक कंपनी जी मोठ्या ब्रँडचे शूज बनवते, त्या कंपनीचे मालक आधी महाराष्ट्रात येऊन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची, उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन गेले. पण नंतर ही कंपनी तमिळनाडूमध्ये गेली. देशात आल्याचा आनंद आहे. पण राज्यातील मोठ्या मंत्री महोदयांना भेटून नंतर ही कंपनी दुसऱ्या राज्यात जाते, याचे दुःख होते. त्यामुळे जे उद्योगमंत्री आहेत, त्यांचे उद्योग काय हे आम्हाला माहित नाही. पण ते सगळ्यात मोठे फेल्युअर असलेले उद्योगमंत्री आहेत, ज्यांच्या कार्यकाळात सहा की सात मोठ्या कंपन्या गेल्या आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सामंत यांच्यावर टीका केली.

गरजेचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात ढकलले जातायत
जे प्रकल्प आपल्या राज्यात हवेत, जे प्रकल्प गरजेचे आहेत, ते दुसऱ्या राज्यात तिथे निवडणुका असल्याने ढकलले जात आहेत. तर ज्या प्रकल्पांना स्थानिक नागरिक विरोध करत आहेत, असे प्रकल्प लादले जात आहेत. हे अत्यंत भयानक चित्र आहे, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी बोलताना सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -