घरमहाराष्ट्रमहामार्गांवरील अपघातात घट

महामार्गांवरील अपघातात घट

Subscribe

2019 मध्ये 2 हजार 569 अपघात घटले, महामार्ग पोलिसांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील महामार्गांवर होणार्‍या अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सन २०१८ च्या तुलनेत सन २०१९ मध्ये अपघातांची संख्या २ हजार ५६९ ने घटली आहे. अपघातांची संख्या घटल्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत ४८२ ने तर जखमींच्या संख्येतही २ हजार ३०० ने घट झाली आहे. महामार्ग पोलिसांनी सुरू केलेल्या ‘हायवे मॅनर्स’ या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांनीकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 34 राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून 17 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. राज्यातील 34 राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यामातून विविध सहा राज्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय राज्य महामार्गांच्या रुपात महाराष्ट्रात 35 हजार किलोमीटरचे जाळे आहे. या महामार्गांवर 2018 मध्ये एकूण 35 हजार 717 अपघात झाले होते. या अपघातात 13 हजार 261 लोक मृत्युमुखी पडले. तर 31 हजार 365 जण जखमी झाले. तर 2019 मध्ये एकूण 33 हजार 148 अपघात झाले आहेत. या अपघातात 12 हजार 277 मृतांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 65 जखमी झाले आहेत. अपघात घटल्याने मृतांचा आकडाही 482, तर जखमींची संख्याही 2 हजार 300 ने कमी झाली आहे. महामार्ग पोलिसांनी सुरू केलेल्या ‘हायवे मॅनर्स’ या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सर्वाधिक अपघात
राज्यात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 36 टक्के अपघातांची नोंद आहे. याउलट राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर 33 टक्के अपघातांची नोंद आहे. तसेच नाशिक, धुळे, पालघर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि वर्धा या जिल्ह्यांत सर्वाधिक अपघात झाले असून यात अतिवेगाने गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, विनाहेल्मेट किंवा विनासीटबेल्ट गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, सिग्नल न पाळणे या कारणांमुळेही मोठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे महामार्ग पोलीसांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले आहे.

महामार्ग पोलीसानी हायवे मॅनर्स माणूस या अभियानातून वाहक चालकांना नियमाबाबद जनजागृती केली. तसेच सातत्याने नियमाचा भंग करणार्‍या वाहन चालकावर कारवाई केली. त्यामुळे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अपघातांमध्ये घट झाल्यामुळे मृतांचा आणि जखमींचाही आकडाही कमी झालेला आहे.
-विजय पाटील, अधीक्षक, महामार्ग पोलीस

- Advertisement -

वर्ष अपघात मृत्यू जखमी
2018 35717 13261 31365
2019 33148 12779 29065
…………………………………………..
कमी -2569 -482 -2300
……………………………………….

राज्यातील महामार्गांवर अपघात
……………………………….
महिना 2018 2019
……………………………..
जानेवारी 3082 3272
फेब्रुवारी 2861 2806
मार्च 3087 3058
एप्रिल 3131 2790
मे 3401 3264
जून 2909 2822
जुलै 2393 2565
ऑगस्ट 2572 2416
सप्टेंबर 2733 2270
ऑक्टोबर 3181 2208
नोव्हेंबर 3143 2746
डिसेंबर 3224 2931
…………………………………………………..
एकूण 35717 33148
…………………………………………………..

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -