घरताज्या घडामोडीअदर पुनावाला धमकी प्रकरण, महासंचालक, पुणे सीपींनी चौकशी करावी, HC मध्ये रिट...

अदर पुनावाला धमकी प्रकरण, महासंचालक, पुणे सीपींनी चौकशी करावी, HC मध्ये रिट याचिका दाखल

Subscribe

याचिकेत अदर पुनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचीही मागणी

देशातील आघाडीची कोरोना लस उत्पादित कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांना बड्या राजकीय नेते आणि व्यवसायिकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. असा गौप्यस्फोट स्वतः अदर पुनावाला यांनी मुलाखतीदरम्यान केला होता. यानंतर देशातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. अदर पुनावाला यांना धमकी प्रकरणात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी महासंचालक, पुणे सीपींनी करावी आशी मागणी करण्यात आली आहे. अदर पुनावाला यांना लसींचा साठा पुरवण्यावरुन राजकीय नेते आणि बड्या व्यवसायिकांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच जर त्यांनी खरे बोलले तर गळा कापून टाकतील अशी भीती पुनावाला यांनी व्यक्त केली होती.

सीरमचे संस्थापक अदर पुनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणात आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड दत्ता माने यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. महासंचालक किंवा पुणे सीपींनी अदर पुनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या याचिकेत अदर पुनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

मुलाखतीमध्ये अदर पुनावाला यांनी फोन कॉल हे वाईट गोष्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी असा खुलासा केला आहे की, देशातील श्रीमंत आणि बड्या राजकीय हस्थींकडून धमकावण्यात येत आहे. अदर पुनावाला यांनी फोन कॉलवरुन सांगितले की, देशातील शक्तिशाली नेते, व्यक्तिंचे फोन येतात. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे, व्यावसायिक प्रमुखांचे कोविशिल्ड लसीच्या तात्काळ पुरवठ्याची मागणी करण्यासाठी फोन येत असतात. लस मिळवण्याची इच्छा आणि आक्रमकता यातील अंतर अभूतपूर्व असल्याचे अदर पुनावाला यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे. काही फोन कॉल धमक्यांचे आले आहेत. यामध्ये जर खर बोलोल तर शीर कापले जाईल अशी भीती अदर पुनावाला यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा : मला धमक्या मिळतायतं, सत्य बोलल्यास शीर कापले जाईल, अदर पुनावाला यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -