घरताज्या घडामोडीआमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल तर.., आदित्य ठाकरेंचा इशारा

आमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल तर.., आदित्य ठाकरेंचा इशारा

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला नाव आणि चिन्ह दिल्यानंतर राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह आणि नाव देखील देण्यात आले आहे. दरम्यान, आमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल तर आम्ही त्याविरोधात उभे राहू, असा इशारा आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

आदित्य ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमचा धर्म सर्वांची सेवा करा आणि सोबत घेऊन चाला हे शिकवतो. हिंदुत्वाचा विचार केला तर उद्धव ठाकरेंनी जितक्या वेळेस अयोध्येला भेट दिली. तितकी क्वचितच संपूर्ण देशातील कोणीही भेट दिली असेल. आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे. आम्ही औरंगाबादचे आणि उस्मानाबादचे नाव बदलले तेव्हा हिंसाचार झाला नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढणार की, पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करणार, हा देखील प्रश्न आहे. गद्दारांना पुन्हा जागा दिली जाणार नाही, त्यांच्या जागेवर ते निवडून येतील का, हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. अनेकांची आता निवृत्तीची योजना तयार केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : भाजपाला टार्गेट करत, नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या नावावरून शिंदे गटाला केले ट्रोल

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -