घरमहाराष्ट्रधक्कादायक! राज्याच्या मंत्रालयातच दुषित पाणी; अधिकारी कर्मचारी रुग्णालयात

धक्कादायक! राज्याच्या मंत्रालयातच दुषित पाणी; अधिकारी कर्मचारी रुग्णालयात

Subscribe

राज्याच्या कारभार जेथून हाकला जातो आणि विविध शहरे व गावांच्या शुद्‌ध पिण्याच्या पाण्याची धोरणे जिथे ठरविली जातात, त्याच मंत्रालयाला दुषित पाण्याची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहेमंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दुपारी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. दुपारी  सुमारे १०० कर्मचाऱ्यांना हा त्रास झाल्याचे समजते.

सकाळपासून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना, अधिकारी वर्गाला पाणी बाधल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. काही जणांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्रालयातील पाण्याला वास येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पण कोणतीही कारवाई न झाल्याने हे पाणी बाधल्याचे समोर आले आहे. मंत्रालयात हजारो अधिकारी व कर्मचारी येत असतात. दुषित पाण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मागणी केली आहे. विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली. सरकार पक्षातर्फे चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.

- Advertisement -

सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून दोन दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी उसळीत चिकनच्या मांसाचे तुकडे आढळले होते त्यानंतर हे प्रकरण सभागृहातही गाजले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -