घरमहाराष्ट्रभगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

Subscribe

आदित्य ठाकरे वरळीला आपला गड असल्याचं मानतात मात्र, युतीमुळेच ते जिंकून आले असं आशिष शेलार म्हणाले होते. त्यानंतर, आज पुन्हा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

मुंबई – वरळी मतदारसंघावरून सध्या भाजपा आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरू आहे. वरळी हा आमचा गड आहे, असा दावा युवानेता आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!!’ असं ट्विट अॅड. आशिष शेलार यांनी केलं आहे. (Adv Ashish Shelar taunt to Aditya Thackeray on worli constituency)

हेही वाचा – आदित्य ठाकरे मोदी लाटेतून जिंकले, त्यांचं अभ्यास करण्याचं वय; आशिष शेलारांचा पलटवार

- Advertisement -

शिवसेनेनेचे आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत ते जिंकून आले. मात्र, ते मोदी लाटेतून जिंकून आले असून युतीमध्ये होते म्हणून आमदार बनले असा दावा आशिष शेलार यांनी बुधवारी केला होता. आदित्य ठाकरे वरळीला आपला गड असल्याचं मानतात मात्र, युतीमुळेच ते जिंकून आले असं आशिष शेलार म्हणाले होते. त्यानंतर, आज पुन्हा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ‘मतदारांची हंडी’ फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

- Advertisement -

“ज्या वरळीत सेनेच्या(?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय… दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय,” असं आशिष शेलार म्हणाले.


पुढे ते म्हणतात की, ‘भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे… आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत… लवकरच.. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणुकीत “करून दाखवतील” आमचं ठरलंय!!’

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -