घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरकाँग्रेसला खिंडार! औरंगाबादच्या नामांतरानंतर जिल्हाध्यक्षासह २०० कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

काँग्रेसला खिंडार! औरंगाबादच्या नामांतरानंतर जिल्हाध्यक्षासह २०० कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Subscribe

औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला असून २० ते २५ पदाधिकाऱ्यांनीसुद्धा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक निर्णय म्हणजे औरंगाबाद नामांतराचा. औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पदाचा राजीनामा दिला असून २० ते २५ पदाधिकाऱ्यांनीसुद्धा राजीनामा दिल्याचं वृत्त समोर येत आहे. तर, २०० हून अधिक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. (After the renaming of Aurangabad, 200 karyakarta including the district president left the congress party)

हेही वाचा – विधानसभेत विरोधी पक्षनेते कोण? अजित पवार की जयंत पाटील?

- Advertisement -

औरंगाबाद शहराचे नामकरण करून संभाजीनगर करण्यात यावे अशी मागणी गेली कित्येक वर्षे होत होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही या मागणीने जोर धरला होता. मात्र, अडीच वर्षांच्या कार्यकाळात ही मागणी पूर्ण झाली नाही. दरम्यान, औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांना नामांतरणाविषयीचे वचन दिले होते. त्यानुसार, महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत नामांतरणाचा मुद्दा मंजूर करण्यात आला.

हेही वाचा – औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामांतर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या काळात नामांतरण झाल्याने घटकपक्ष राहिलेल्या काँग्रेसने याविरोधात संताप व्यक्त केला आहे. पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. त्यांच्यापाठोपाठ २० ते २५ पदाधिकारी तर, २०० हून अधिक कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेले आहेत.

दरम्यान, महापालिका निवडणूक जवळ आलेली आहे. त्या काळातच काँग्रेसला खिंडार पडल्याने येत्या काळात औरंगाबादच्या काँग्रेसमध्ये काय उलथापालथ होतेय हे पाहावं लागेल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -