घरमहाराष्ट्रAhmednagar News: अरेरे! मांजरीला वाचवताना एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Ahmednagar News: अरेरे! मांजरीला वाचवताना एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Subscribe

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली.

अहमदनगर: मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी येथे घडली. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला तो बुडत असताना इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात तेही बुडाले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं आहे. परंतु पाच जणांना मात्र आपला प्राण गमवावा लागला आहे. (Ahmednagar News Newasa District Wakadi gaon 5 members of the same family die rescuing a cat from biogas pit )

नेमकं घडलं काय?

नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं आणि त्या मांजराला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला. मात्र त्याला बाहेर येता येत नसल्यानं एका मागे सहाजण एकमेंकाना वाचवण्यासाठी गेले आणि त्या खड्ड्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने अडथळे येत होते. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने एकाला लवकर बाहेर काढण्यात यश आलं मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दुर्दैवाची बाब ही आहे की, ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे.

  • माणिक गोविंद काळे
  • संदीप माणिक काळे
  • बबलू अनिल काळे
  • अनिल बापूरावा काळे
  • बाबासाहेब गायकवाड

अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता. काल रात्री चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर एकाला वाचवण्यात यश आलं. आपात्कालीन यंत्रणा नसल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अखेर पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं.

- Advertisement -

(हेही वाचा: Bus Accident : छत्तीसगडमध्ये मजुरांना घेऊन जाणारी बस खाणीत कोसळली; 15 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -