घरमहाराष्ट्रAjit Pawar : भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री करतील; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दावा...

Ajit Pawar : भाजपा अजित पवारांना मुख्यमंत्री करतील; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दावा करताना तारीखही सांगितली

Subscribe

Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) काही आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnvis Government) सामील झाले. यानंतर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार असल्यामुळे अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या वाढदिवसानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले होते. याचदरम्यान, एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी सहकुंटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्यामुळे त्यांनी मोदींचे भेट घेतली असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदाराने केले होते. ही सर्व चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्यांने दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजित पवार मुख्यमंत्री होतील. त्यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. (BJP will make Ajit Pawar the Chief Minister The senior Congress leader also mentioned the date while making the claim)

हेही वाचा – Covid Center Scam : सूरज चव्हाणांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना वक्तव्य केले की, आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार नाही, कारण एकनाथ शिंदे यांचा ठाण्याबाहेर फारसा प्रभाव दिसत नाही. नुकतेच अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा पर्याय आहे. त्यामुळे येत्या 10 ऑगस्टला एकनाथ शिंदे यांच्या पक्षांबद्दल निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. आगामी लोकसभा निवडणुकींचा विचार करून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा – BMC : मुंबई पालिकेच्या कंत्राटात ‘अनियमितता’, SITकडून तीन प्राथमिक चौकशींची नोंद

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दौरे वाढले आहेत. तसेच पुढील काही दिवसात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागू शकतो. त्यामुळे खरंच एकनाथ शिंदे याचं मुख्यमंत्री जाणार का? आणि अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल का? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. पण राजकीय वर्तुळासोबतच सामान्य जनतेतही एकनाथ शिंदे याचं मुख्यमंत्रीपद जाणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून अजित पवार यांच्याकडे देणार असल्याच्या चर्चांवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही पक्षातील लोकांना असं वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. यात वावगं काही नाही. राष्ट्रवादी पक्षातील लोकांना वाटू शकतं अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं भाजपाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मात्र मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतल्या सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री याठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -