घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर Ajit Pawar : आधी पिसिंग-पिसिंग म्हणायचे आता किसिंग किसिंग सुरू…”; दानवेंनीही फडणवीसांना...

Ajit Pawar : आधी पिसिंग-पिसिंग म्हणायचे आता किसिंग किसिंग सुरू…”; दानवेंनीही फडणवीसांना लगावला टोला

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ‘उप’ म्हणून पुन्हा आले. ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही. आता दिल्लीश्वरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीस यांची अवस्था आणखीनच बिकट केली आहे. ‘‘मी पुन्हा पुन्हा पुन्हा ‘उप उप उप उप’ म्हणून आलो,’’ हे घोषवाक्य अजित पवार यांना शोभते. अजित पवार (Ajit Pawar) यांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अशी टीका बोचरी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही अजित पवारांचा  उल्लेख करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. (Ajit Pawar Earlier it was called pissing pissing now kissing kissing Fadnavis was also attacked by Danve)

हेही वाचा – …आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, ठाकरे गटाचे फडणवीस यांच्यावर शरसंधान

- Advertisement -

माध्यमांशी अंबादास दानवे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आधी अजित पवारांना पीसिंग-पीसिंग म्हणायचे आणि आता त्यांचं अजित दादांसोबत किसिंग-किसिंग चालू आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली राज्याचं  नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला काम करावं लागत आहे. त्यामुळे आज सामनाच्या अग्रलेखातून देखील त्यांना सांभाळून राहा असं सांगण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस पूर्वी अजित पवार यांच्याविरुद्ध बैलगाडीवर पुरावे घेऊन आंदोलन करत होते. आधी ते अजित पवारांना चक्की पिसिंग-पिसिंग म्हणायचे आणि आता त्यांचं अजित पवारांसोबत किसिंग किसिंग चालू आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

ग्राहक वाढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू

शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधताना अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे गट दोन्ही पक्षांना पुरून उरणार आहे. आगामी निवडणुकांसाठी कोणी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेलं असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांना पराभूत करणार आहोत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच विजय होईल, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, भाजपा सध्या ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. जुन्या लोकांना ते कुठेतरी स्टोरेजमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपामध्ये मूळ नेते बोटावर मोजण्या इतके राहिले आहेत, असेही दानवे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आता काय सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अजित पवारांवरून ठाकरे गटाची फडणवीसांवर टीका

फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे योग्य नाही

दरम्यान, सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना ठाकरे गटाने म्हटले की, फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच भांबावलेल्या मनस्थितीत असल्याने राज्यातील कायदा- सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळया भररस्त्यांवर हल्ले होत आहेत. त्यावर बोलायचे सोडून फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे योग्य नाही. कारण ते ‘उप’ म्हणून पुन्हा आले असले तरी ते संपूर्ण आलेले नाही. दिल्लीश्वरांनी अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीसांची अवस्था बिकट केली, अशी बोचरी टीका आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisment -