घरमहाराष्ट्रअजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता - संजय राऊत

अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता – संजय राऊत

Subscribe

जळगाव : अजित पवार (Ajit Pawar) भाजापसोबत जाणार आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, मात्र अजित पवार यांनी जीवातजीव असेलपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असे सांगून चर्चांना पुर्णविराम दिला. असे असले तरी अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे, असे सूचक वक्तव्य ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जळगावमधील पाचोऱ्यात उद्या सभा होणार यानिमित्त संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही आणि अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 2024 ला शिंदे गटाचा पराभव झाला तर, निवडणूक आयोग आम्हाला शिवसेना देणार का? – संजय राऊत

ते म्हणाले की, अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून, तोडफोड करून मुख्यमंत्री होत असतात. एखाद्याच्या भाग्यात लिहिले असेल तर ते मुख्यमंत्री होतात. अजित दादांची इच्छा आहे आणि त्यांनी ती पहिल्यांदा व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

जीवातजीव असेपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार
सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार पडणार, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र अजित पवार यांनी मी जीवातजीव असेपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला. परंतु, त्यानंतरही या चर्चा थांबल्या नाहीत. अशातच अजित पवार यांनी एक मोठं विधान केले आहे. मुख्यमंत्रीपदावर आत्ताच क्लेम करायला तयार असल्याचे विधान अजित पवार यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -