घरमहाराष्ट्र'त्या' विधानामागे क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड सभागृहात नव्हता; अजित पवारांचा कोणावर रोख?

‘त्या’ विधानामागे क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड सभागृहात नव्हता; अजित पवारांचा कोणावर रोख?

Subscribe

विधानसभेतील भाषण केला तेव्हा आक्षेप घेतला नाही. दोन दिवसानंतर ठरलं, एक ग्रुप आहे तो बसतो आणि आता कुठे डोकं चालवायचं, कुठून काय काढायचं मग लक्ष्य विचलित करण्यासाठी काय करायचं, मग आता ही संधी असल्याचं त्यांना वाटलं. अजित पवार बोलतचं नाही म्हणाले. आम्हाला प्रेमानं पत्र आली, त्या पत्राची नोंद आम्ही एवढी घेतली की, सभागृहात आम्ही आक्रमक झालो, त्यावेळी कोणी काही बोललं नाही कारण त्यांना ते पटलं होतं. पण ही क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंडही तिथे नव्हता, ते बाहेर होते. पण त्यांच्या कल्पनेतून ते पुढे आलं, त्यानंतर आदेश निघाले की, असे आंदोलन करा. फोटो जाळा, असे फोटो काढा, चपलेने मारा. चपलेने मारा म्हणजे फोटोला मारा, असा चपलेने मारला तर ऐकतोय हो मी, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

त्यामुळे दुसरं कोणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही

धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही मोबाईवरील इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण ‘धर्मवीर’ आहे. काहींचे तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर पार्ट 2 येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणत असाल तर दुसरा कोणी दुसरी व्यक्ती होऊच शकत नाही, स्वराज्य रक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे दुसरं कोणाला स्वराज्य रक्षक म्हणता येणार नाही, असं मत देखील अजित पवार यांनी मांडले.

- Advertisement -

त्यामुळे मी खूप मोठी चूक केली असा मला वाटत नाही. ज्यांना योग्य वाटतं त्यांनी स्वीकारा, ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी सोडून द्या. आम्ही म्हणत नाही तो मुद्दा धरूनचं ठेवा. पण त्यासंदर्भात बाकीच्यांनी मला सांगण्याच कारण नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, त्यांच्या पक्षासंदर्भात त्यांना काय भूमिका घ्यायची ती त्यांनी घ्यावी, महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांनी जी विधाने केली, त्यामुळे जे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ही टूम काढली आहे, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.

शिवसेना – वंचित आघाडीवर अजित पवार स्पष्टचं म्हणाले की… 

मविआमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आपल्या मित्र पक्षाला आणावे. आम्ही वंचितला विरोध केलेला नाही. सगळ्या मित्र पक्षाला आणावं. एकत्र तीन पक्ष बसून जागा वाटप करताना त्यांच्या मित्र पक्षाला त्यांच्या जागा देतील, असेही अजित पवार म्हणाले.


मी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -