घरमहाराष्ट्रNCP : भाजपनंतर 'दादां'च्या नेतृत्वाखालील पक्ष सर्वात मोठा; भुजबळांची शिंदे गटावर कुरघोडी!

NCP : भाजपनंतर ‘दादां’च्या नेतृत्वाखालील पक्ष सर्वात मोठा; भुजबळांची शिंदे गटावर कुरघोडी!

Subscribe

आज (18 जानेवारी) राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला काँग्रेसच्यावतीने 'निर्धार नारी शक्तीचा' हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

मुंबई : हा पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा आहे. निवडणूकीतून त्याचे मोजमाप होणार आहे. आपण कुठे आहोत हे ठरणार आहे. मागील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपनंतर दोन नंबरचा पक्ष अजित पवार यांचा होता हे राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे. परंतु ताकद अजून वाढवावी लागेल असेही छगन भुजबळ म्हणाले. तेव्हा मंत्री छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे आहे. याबाबत आता चर्चा रंगत आहे. (NCP Biggest party led by Dada after BJP Bhujbals attack on the Shinde group)

आज (18 जानेवारी) राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला काँग्रेसच्यावतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’ हे घोषवाक्य वापरत राज्यस्तरीय भव्य मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

- Advertisement -

पुढे बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, निर्धार माँ जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचा केला. निर्धार सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा केला. अहिल्यादेवी होळकरांनी केला. निर्धार रमाबाईंनी केला. निर्धार रकमाबाई राऊत यांनी केला. ठीक आहे तुम्हाला तेवढं मोठं होता येणार नाही मात्र पाऊल तर टाकावे लागेल अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यासाठी सर्व समाजातील घटकाला घेऊन पुढे जावे लागेल असेही स्पष्ट केले.

तुम्ही सर्वांसाठी काम करा असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी संत कबिरांचा दोहा ऐकवला. बुरा सोचना, बुरा देखना. लेकीन दिल मे खोजा तो बुरा ना कोय असे यातून स्पष्ट होते त्यामुळे कुणाबद्दल वाईट बोलू नका स्वतः ला तपासा असे स्पष्ट केले. जिंदगी जिंदादाली का नाम है. मुर्दा दिली का नही. जो जिंदा आहे तो लढेल तुमचं दिलच मुर्दा बनेल असेल तर तुम्ही कसे लढणार त्यामुळे तुम्ही लढत रहा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना

मुलींच्या जन्मापासून शून्य ते 18 वर्षे होईपर्यंत तिच्या संगोपनासाठी टप्प्या-टप्प्याने 1 लाख रुपये मिळणार असून अशा सुमारे अडीच लाख मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली.

हेही वाचा : Bhalchandra Nemade : केवळ वाल्मिकींचा राम खरा कसा मानायचा? भालचंद्र नेमांडेंचा थेट सवाल

खूप मोठा पल्ला गाठायचा आहे-अजित पवार

महिला निर्धार मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही जिजाऊ, सावित्रीबाईच्या लेकी आहात. छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचे राज्य तयार केले तर सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. यांची प्रेरणा घेऊन नवीन मुलींना, तरुण पिढीला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यांनी दिलेला वारसा जपायचा आहे असे आत्मविश्वास निर्माण करणारे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला मेळाव्यात केले.

हेही वाचा : Ministry of Defence India : 10 वी उत्तीर्ण बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी; वाचा सविस्तर

यावेळी प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन गीत ‘अजिंक्य भगिनी’ अजित भगिनी’… यावेळी सादर केले. या गीताचे प्रकाशन ‘वन्स मोअर’ ने महिलांनी केले.

भव्य नारी शक्ती निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार बाबासाहेब पाटील,मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आदींसह राज्यातून आलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -