घरताज्या घडामोडीशिवसैनिकांच्या आक्रमक भुमिकांमुळे राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर

शिवसैनिकांच्या आक्रमक भुमिकांमुळे राज्यातील सर्व पोलीस स्टेशन हाय अलर्टवर

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्याचे प्रमुख नेतृत्व असलेले शिवसैनिक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंड पुकारत शिंदे गटात सहभात घेतला.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्याचे प्रमुख नेतृत्व असलेले शिवसैनिक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांनी बंड पुकारत शिंदे गटात सहभात घेतला. सध्या हे सर्व आमदार आसाममधील गुवाहटीतील रेडिसन्स ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामास आहे. परंतु, शिवसेनेच्या जवळपास ३७ आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहे. रस्त्यावरून आमदारांविरोधात घोषणा देत रोष व्यक्त करत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना (Mumbai Police) विशेष खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील अशी सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील शांततेला कोणताही धक्का लागू नये यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (All police stations in the state are on high alert due to the aggressive role of Shiv Sainiks)

- Advertisement -

हेही वाचा – मातोश्रीवर ठाकरे-पवार यांची 70 मिनिट बैठक, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित

बंडाळीनंतर शिवसैनिकांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला (Kurla) येथील नेहरु नगर येथील कार्यालयावर हल्ला केला. त्यावेळी शिवसैनिकांच्या हातात लोखंडी रॉड होते. शिवसैनिक त्या रॉडने मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर हल्ला करत होते. तसेच, त्यांच्या नावाचे बॅनर फाडलं. तसेच त्यांचा बॅनवरील फोटो देखील फाडला. शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचाही बॅनर फाडला. नाशिकमध्येही एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक झाली. मुंबईच्या दादरमध्ये असलेल्या शिवसेनाभवनात ही बैठक झाली.


हेही वाचा – शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे भावूक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -