‘डान्सिंग डॉल’च्या उल्लेखामुळे अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस

भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारिया यांना वादग्रस्त ट्विट् केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांनी केलेल्या वादग्रस्त टिपण्णीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत या प्रकरणात अमृता फडणवीस यांना ओढलं होतं.

Amrita Fadnavis issues notice to Vidya Chavan for mentioning 'Dancing Doll'
'डान्सिंग डॉल'च्या उल्लेखामुळे अमृता फडणवीसांची विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह ट्विट्मुळे संपूर्ण राजकारण तापलं होतं. भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारिया यांना वादग्रस्त ट्विट् केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्यांनी केलेल्या वादग्रस्त टिपण्णीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत या प्रकरणात अमृता फडणवीस यांना ओढलं होतं. राबडी देवीची उपमा रश्मी ठाकरेंना दिली हे बरं झालं, जर फडणवीसांच्या पत्नीची प्रतिमा दिली असती तर ‘डान्सिंग डॉल’ अशी प्रतिमा झाली असती, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. या त्यांनी केलेल्या ‘डान्सिंग डॉल’च्या उल्लेखामुळे अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली.

 

आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजपचा गजारिया पोलिसांच्या ताब्यात

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरेही मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच आता नव्या वादाला तोंड फुटलंय. विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलच्या जितेन गजारियानं या प्रकरणात वादग्रस्त ट्विट केलंय. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट जितेन गजारिया यानं केलं होतं. भाजप महाराष्ट्र IT सेल प्रभारी जितेन गजारिया याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याला BKC येथील सायबर पोलीस स्थानकात नेण्यात आलंय. मुंबई सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर या स्टेटमेंट रेकॉर्ड करीत आहेत.


हे ही वाचा – Corona Virus : गृहमंत्री वळसे पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, २१ कर्मचारी पॉझिटिव्ह