Extortion Case : रियाझ भाटीला हायकोर्टाचा दिलासा, फरार घोषित केल्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश रद्द

या खंडणी प्रकरणातील आरोपाविरोधात रियाझ भाटीने मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर रियाझ भाटीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला

FPJ Legal: Bombay HC quashes proclamation against Riyaz Bhati in extortion case involving Param Bir Singh
Extortion Case : रियाझ भाटीला हायकोर्टाचा मोठा दिलासा : फरार घोषित केल्याचा दंडाधिकारी कोर्टाचा आदेश रद्द

गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह फरार आरोपी घोषित केलेल्या रियाझ भाटीला हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. या खंडणीच्या प्रकरणात हायकोर्टाने रियाझ भाटीला फरार घोषित केल्याचा दंडाधिकारी कोर्टाचा आदेश रद्द केला आहे.

खंडणीच्या याच प्रकरणात यापूर्वी विनय सिंह यालाही फरार घोषित केल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला होता. रियाझ भाटी हा आरोपी डॉन दाऊन इब्राहिम याचा हस्तक म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत मुंबईसह राज्यात त्याच्याविरोधात अनके गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात झालेल्या खंडणी प्रकरणातील आरोपांमध्ये रियाझ भाटी याचे नाव समोर आले होते. या वसुलीच्या आरोपांमुळे रियाझ भाटीचे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंध जोडले जात आहेत. त्यामुळे क्राईम ब्रॅंच रियाझ भाटीच्या शोधात आहे.

या खंडणी प्रकरणातील आरोपाविरोधात रियाझ भाटीने मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. यानंतर रियाझ भाटीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

रियाझ भाटी हा सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत बार आणि रेस्टॉरंटमधून खंडणी वसूल करण्याचे काम करत होता. सध्या सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या कस्टडीत आहे. गोरेगावच्या एका बांधकाम व्यावसायिकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सचिन वाझेच्या माध्यमातून परमबीर सिंह यांचे खंडणीतील कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या आरोपींना फरार म्हणून घोषित केले होते.


Omicron Symptoms: AIIMS ने सांगितले ओमिक्रॉनची 5 ची धोकादायक लक्षणे