घरदेश-विदेशपोलीस अमृतपाल सिंहच्या मागावर, SUV मधून टोल प्लाझा ओलांडताना CCTV मध्ये कैद;...

पोलीस अमृतपाल सिंहच्या मागावर, SUV मधून टोल प्लाझा ओलांडताना CCTV मध्ये कैद; महाराष्ट्रात येण्याची शक्यता

Subscribe

अमृतपाल शनिवारी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून तो एका एसयुव्हीमधून टोल प्लाझा ओलांडताना दिसत आहे.

फरारी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरुच असून या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंह प्रकरणी आता महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर आहेत. नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांकडून विशेष सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये येणाऱ्या प्रत्येकावर आता पोलिसांची करडी नजर आहे.

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह अद्याप फरार असून पंजाब पोलिसांनी शोधमोहिम राबवली असून ही मोहीम सुरूच आहे. 18 मार्चपासून अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे. अमृतपाल सिंह अद्यापही फरार असल्याचं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे. अमृतपालच्या संदर्भात महाराष्ट्रातील नांदेड, उत्तराखंडमधील उधम सिंह नगर, हरिद्वार आणि डेहराडून पोलीस सतर्क आहेत. सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे. गुप्तचर यंत्रणा आणि एसटीएफलाही राज्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या गुप्तचर संस्थेसह अन्य पोलीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अमृतपाल शनिवारी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून तो एका एसयुव्हीमधून टोल प्लाझा ओलांडताना दिसत आहे. या फुटेजमध्ये अमृतपाल कारच्या पुढील सीटवर बसलेला दिसत आहे. अमृतपाल सिंग मर्सिडीज एसयूव्हीमधून पळून जाताना दिसला. पण, जालंधरमधील टोल बूथवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो ब्रेझा कारमध्ये दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगने आधी कार बदलली आणि नंतर ब्रेझामध्ये कपडे बदलले. त्याने आपले पारंपारिक धार्मिक कपडे बदलून शर्ट-पँट परिधान केलं आणि बाईक सोडण्यापूर्वी पगडीही बदलली. व्हिडीओमध्ये दाखवल्या गेलेल्या वेळेनुसार, हे १८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताचे दृश्य आहे. या एसयूव्हीच्या मागे इतर अनेक काळ्या आणि पांढऱ्या रंगाची वाहनेही येताना दिसतात.

ल्या चार दिवसांपासून हजारो पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी खलिस्तानी दहशतवाद्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी १२० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र अमृतपाल सिंग पोलिसांना चकमा देऊन अजूनही फरार आहे. याबाबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना फटकारले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे नांदेड पोलीसही आता अलर्ट झाले आहेत. नांदेड शहरात पंजाबमधून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मागील काही दिवसांत नांदेडमधूनही काही खलिस्तानी समर्थकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडलाही येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. नांदेडमध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर पोलीस नजर ठेवून आहेत.

कोण आहे अमृतपाल सिंह?
‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह यांचा जन्म 1993 मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा गावात झाला. अमृतपाल तरसेम सिंह यांचा मुलगा आहे. अमृतपाल 2012 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो 10 वर्षे म्हणजे 2022 पर्यंत दुबईत राहिला. यादरम्यान त्याचे केस आणि चेहऱ्यावर दाढी वाढवलेली नव्हती.

अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक आहे. अमृतपालला सप्टेंबरमध्ये संस्थेचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. ‘वारीस पंजाब दे’ ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ ​​दीप सिद्धूने स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -