घरअर्थसंकल्प २०२२ST Workers Strike : त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजुरी गरजेची...

ST Workers Strike : त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजुरी गरजेची – परिवहन मंत्री अनिल परब

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीत विधानपरिषदेचे सदस्य जयंत पाटील यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याची संख्या वाढत असल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सभागृहात आक्रमक झाले होते. दरेकरांनी याबाबत राज्य सरकारवर देखील टीका केली. परंतु त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजुरी गरजेची असल्याचे विधानपरिषदेचे सदस्य आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधानपरिषदेत मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीकोनातून आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटीचा संप मिटणे हे खूप गरजेचं आहे. हे प्रकरण कोर्टात देखील सुरू आहे. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंजूर करण्यासाठी कोर्टाने राज्य शासनाला सूचना दिलेली आहे. परंतु हा अहवाल मंजूर करताना राज्य शासनाला कॅबिनेटसमोर मंजूरी घ्यावी लागते. आज किंवा पुढील दोन दिवसात कॅबिनेटची बैठक होईल. तेव्हा कॅबिनेटमध्ये हा ठराव ठेवला जाईल. त्रिसदस्यीय समितीच्या तरतुदींसाठी आर्थिक बाबींवर शासन मंजुरी गरजेची असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी संपाबाबत त्रिसदस्यीय समितीने सुचवलेल्या शिफारशींवर आर्थिक तरतूद करण्यासाठी कॅबिनेट बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. अधिवेशाचं कामकाज सुरू असताना आठ ते दहा एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. तसेच ही अत्यंत गंभीर बाब असून यावर निर्णय घेणं महत्त्वाचं असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील यांच्यानंतर प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उचलून धरला. एसटीचं विलीनीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांमुळे प्रविण दरेकर सभागृहात आक्रमक झाले.

- Advertisement -

हेही वाचा : King joins RCB camp: किंग कोहली इज बॅक, आरसीबीकडून विराटचे जंगी स्वागत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -