संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.

shiv sena mp eknath shinde critisizes bjp modi govt and shinde group

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट (arrest warrant) जारी करण्यात आले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. या संदर्भात मुंबईतील शिवडी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेत, येत्या १८ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. (arrest warrant issued against shiv sena leader Sanjay Raut after bjp kirit somaiya wife file case in police station)

मेधा सोमय्या यांचे पती आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर संजय राऊत यांच्याविरोधात जारी केलेले अटक वॉरंट शेअर केले आहे. तसेच, “मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी संजय राऊत यांच्याविरुद्ध कलम 499, 500 IPC साठी वॉरंट जारी केले”, असे लिहिले आहे.

शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात राऊत यांच्याविरुद्ध समन्स जारी करून त्यांना ४ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, सोमवारी न्यायालयात राऊत किंवा त्यांचे वकील हजर नव्हते, असे मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा – शिवसेनेचे तुकडे तुकडे झाले आहेत, किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

गुप्ता म्हणाले की, राऊत हजर न राहिल्यामुळे आम्ही त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज केला, त्याला न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती देत ​​18 जुलै रोजी सुनावणी ठेवली.

मेधा सोमय्या यांनी गुप्ता आणि लक्ष्मण कनाल या वकिलांच्या मार्फत दाखल केलेल्या तक्रारीत दावा केला आहे होता. “मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात राऊत आणि त्यांच्या पतीवर आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक आहेत.”, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांच्या विरोधात जारी केलेले अटक वॉरंट ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच, “मेधा सोमैया यांच्या तक्रारी वरून संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी. पेरले तेच उगवतेय…”, असे लिहिले आहे.


हेही वाचा – आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांकडून पंढरपूरला येण्याची विनंती; उद्धव ठाकरे म्हणाले…