घरताज्या घडामोडीभाजपमध्ये ब्राह्मण नेत्यांचं खच्चीकरण, ब्राह्मण महासंघाचा आरोप

भाजपमध्ये ब्राह्मण नेत्यांचं खच्चीकरण, ब्राह्मण महासंघाचा आरोप

Subscribe

शिवसेनेत फूट पाडून शिंदे गटाने (Shinde Group) राज्यात सत्तांतर घडवून आणले आहे. भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. शिंदेगटाने भाजपसोबत युती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळेला परिस्थिती बदलली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मण नेत्याचं बळजबरीने खच्चीकरण करण्यात येत असून देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुद्दाम उपमुख्यमंत्री पद दिल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात ब्राह्मण महासंघाने फेसबूक पोस्ट करत अखिल भारतीय महासंघाने निषेध व्यक्त केला आहे. (Accusation of Brahmin leaders in BJP, allegation of Brahmin mahasangh)

हेही वाचा …तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

- Advertisement -

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण अशा आशयाची पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, पंतप्रधान स्पर्धेमधून हटविण्यासाठी नितीन गडकरींच्या चारित्र हननाच्या माध्यमातून खच्चीकरण केल्यानंतर गेले तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा शडयंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले. आता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले. नंतर मा.एकनाथ शिंदे यानां मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मनाने मुख्यमंत्री पदाचे त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्यानंतर भाजपातील वरीष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आले आहे. भाजपमध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललेलं निदर्शनात येत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हाती

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -