घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राची वाटचाल अराजतेकडे, सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी - आशिष शेलार

महाराष्ट्राची वाटचाल अराजतेकडे, सोमय्यांवरील कारवाईची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी – आशिष शेलार

Subscribe

तक्रार दार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त - आशिष शेलार

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र अराजकतेकडे चालला आहे. सत्तेत बसणारी लोकं अराजकता करत आहेत. सरकारविरोधात कोणी वक्तव्य केले, कोण व्यक्त झालं तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. सोमय्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत या घटनेची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्रात असुरक्षित असलेल्या महिला, गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलिसांना सोमय्यांच्या घराबाहेर लावले आहेत परंतु गावगुंड मोकाट फिरत असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घटना घडत आहेत. विशेषता सरकारी पक्षाकडून घडत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात लोकशाही मुल्यावर सरकार आहे का? हा प्रश्न निर्माण होत आहे. हळूहळू महाराष्ट्र अराजकतेकडे चालले असल्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा त्याच गोष्टी सांगायच्या नाही, म्हटल्या तरी सोशल मीडियावर व्यक्त झाले आणि ते सरकारविराोधात असलं तर त्या युवकाचे मुंडण केलं जाते, कार्टून व्हायरल केलं तर माजी नेवी अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो. कोरोनाचे नियम भंग करुन आरोपी मोकाट फिरत आहेत. हे दाखवल्यावर गुन्हा दाखल केला जातो, संपादकाने टोकाची भूमिका व्यक्त केली तर त्याला घरातून अटक केली जाते, केंद्रीय मंत्री यांनी सरकारविरोधात वक्तव्य केलं तर त्यांना अटक केली जाते, दहशतवादी कारवाई सुरु असताना राज्य पोलीस आणि एटीएस थंड असते असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले का?

पहिल्यांदा असं घडलं आहे की, राज्यामध्ये गृहमंत्री पदावर बसले होते ते वॉन्टेड आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसले सापडत नाही. समोर रोज दिसणारा आमदार आपल्या पक्षातला नाही. असा जाणावल्यावर समोर दिसत असताना लुकआऊट नोटीस काढण्यता येते. त्यामुळे हे सगळे प्रकार महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले का? दुर्दैवाने महाराष्ट्र अराजकतेकडे चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शिवसैनिकांनी न्यायालयाच्या दरवाजावर मारले

सत्तेत बसणारी लोकं अराजकता करत आहेत. कायद्याला कार्यान्वित करणे असे जे कायद्याला कार्यान्वित करणारे तक्रारदार असहाय्य आहे. सामान्य नागरिक असहाय्यतेच्या दिशेना जात आहेत. एक महिला करुणा शर्मा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जाते, रस्त्यामध्ये तिच्यावर खोटे आरोप करण्यात आले. तिला अटकाव करण्यासाठी खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली. एक चित्रफित फिरत आहे. पुण्यातील घटना आहे. लखोबा लोखंडेने एक ट्विटर हँडलवर व्यक्त होणाऱ्या मराठी माणसाला शिवसैनिकांनी न्यायालयाच्या दरवाजावर मारले आहे. न्यायालयात न्याय मागायला जाऊ नये आणि करुणाने पोलीस स्टेशनला जाऊ नये यासाठी सत्ताधारी आडवत आहेत.

- Advertisement -

तक्रार दार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त

सोमय्या तक्रार करायला कोल्हापूरला जात आहेत. तर त्यांना स्थानबद्ध करण्यता येत. तक्रार दारांना स्थानबद्धता आणि गावगुंड्यांना मुक्तता, जी काही पोलिसांनी नोटीस दिली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात सांगितले जात आहे. इथे आलात तक्रार दिली तर तुम्हाला विरोध करणाऱ्या पक्षाचे लोकं कायदा हातात घेतील, सवाल असा आहे की, सोमय्या कायदा घेणार होते का गावगुंड कायदा हातात घेणार होते?. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, यामुळे तक्रार दार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त अशा असहाय्यकतेचे चित्र असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलारांचे राज्य सरकारला प्रश्न

पोलिसांच्या बळाचा वापर ?
खोट्या नोटीस ?
नोटीस दाखवण्याची कार्यपद्धती, खरी नोटीस कराडला दाखवली, खऱ्या नोटीसला उशीर का झाला?
गुन्हेगार कोण माहिती आहे, ते कोण आहेत हे देखील माहिती आहे, त्यांना अटक केली नाही. हा हे पोलिसांनी कामात केलेली कचुराई नाही का?
तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देत असेल, त्याला त्यापासून परावृत्त करणे, स्थानबद्ध करणे याचा अर्थ सरकारी कायदेशीर कामात अडथळा निर्माण करणे होत नाही का?


हेही वाचा : Kirit somaiya vs Hasan mushrif : दोन दिवसात दोन कॉंग्रेसच्या बड्या मंत्र्यांची पोलखोल – चंद्रकांत पाटील


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -