Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र बच्चू कडूंचा महायुतीवर 'प्रहार'; विधानसभेसह लोकसभेवरही दावा

बच्चू कडूंचा महायुतीवर ‘प्रहार’; विधानसभेसह लोकसभेवरही दावा

Subscribe

 

अमरावतीः प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेसह लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. प्रहार जनशक्ती पार्टी विधानसभेच्या १५ ते २० जागा लढवणार आहे. लोकसभेसाठी अमरावती मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा केला आहे. त्यासाठी तयारी सुरु केल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांना नुकताच मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. नागपूर येथे बोलताना आमदार कडू यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटक पक्ष आहोत. मेळघाटामध्ये आमदार राजकुमार पटेल आहेत. मी अचलपूरचा आमदार आहे. त्यामुळे अमरावतीची लोकसभेची जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

अमरावतीत दोन, अकोल्यात दोन, वाशिम, नागपूर, नाशिक, सोलापूर मध्ये एक अशा १५ ते २० जागांसाठी बच्चू कडू आग्रही आहेत. तूर्त तरी आगामी निवडणुका भाजप, शिवसेना आणि प्रहार जनशक्ती एकत्र लढणार आहोत. पुढे काही वेगळा विचार ठरला तर तसा निर्णय घेतला जाईल, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना दोन दिवसांपूर्वीच मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीरपणे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केलं होतं. मंत्रीपदाबाबत ते उत्सुक असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं. त्यांची हीच नाराजी दूर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांना दिव्यांग कल्याण खात्याचं अध्यक्षपद देत, त्याला मंत्रि‍पदाचा दर्जा असल्याचं म्हटलं आहे.

मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यांनतर बच्चू कडू यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केले. यासाठी त्यांची तयारीही सुरु झाली आहे. काही जागा आपल्यासाठी सोडव्यात, अशी मागणी ते शिंदे-फडणवीस सरकारकडे करणरा आहेत. परिणामी शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुःखी वाढणार आहे.

- Advertisment -