पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, उडवली खिल्ली

Banner in the pune area against Chandrakant Patil of NCP Youth Congress
पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, उडवली खिल्ली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कशाला राजकारणात राहाता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकात पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाली असून पाषाण भागात त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुणेरी (pune) बॅनर लावला आहे.

एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार…’ असे बॅनरवर लिहीले आहे. याशीवाय बॅनरवर ‘चंपावाणी’ असा हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आला आहे. हा बॅनर लावल्यानंतर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते –

खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असे काय केले ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळाले, असा सवाल केंद्र सरकारला विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टोला लगावला होता. ‘कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर म्हसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

रुपाली पाटील यांची टीका –

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना कडकडीत इशारा दिला आहे. सुप्रिया सूळेंची माफी मागा अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, तुम्ही आम्हाला मारलं तर आम्ही गाल पुढे करणारे नाहीत तर हात तोडू, असे रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी बाजवले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून अशी भाषा वापरणं योग्य नाही. तुमचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे का वयोमानानं? असा सवालही केला आहे. महिला ही स्वयंपाकघरात गेली तर अन्नपुर्णा असते आणि मसनात गेली तर महाकाली असते, तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांच्या विचाराचं मुंडन महाकाली केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली