घरमहाराष्ट्रठाकरे गटाला मोठा धक्का, विदर्भातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख शिंदे गटात

ठाकरे गटाला मोठा धक्का, विदर्भातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख शिंदे गटात

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गटाला अनेक धक्के मिळाले. शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ, निष्ठावंत सैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिवसेनेला खिंडार पडले. असे असतानाच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातून युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे महापालिका निवडणुकींचा धुराळा उडालेला असताना दुसरीकडे अशाप्रकारे पक्षप्रवेश होत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

- Advertisement -

विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. किरण पांडव हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात, त्यांच्याच प्रयत्नांनी युवासेनेत खिंडार पाडण्यास यश मिळाले आहे. हे सातही युवासेना जिल्हाप्रमुख माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांच्या विश्वासातील सहकारी होते.

ठाकरे गटातही अद्यापही अनेक विश्वासू आणि निष्ठावंत नेते आणि पदाधिकारी आहे. त्यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजपा असा सामना रंगला होता. भाजपाला शिंदे गटाने पाठिंबा दिला होता. तर, महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. शरद पवार, राज ठाकरे यांनी विनंती केल्यानंतर भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर ऋतुजा पटेल यांच्यासह सहा उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये ऋतुजा लटके यांनी बाजी मारली. ऋतुजा लटके यांच्या वियजामुळे ठाकरे गटाला उभारी मिळाली आहे. परंतु, त्यातच विदर्भात आता खिंडार पडल्याने ठाकरे गटाचे टेन्शन अधिक वाढलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -