घरताज्या घडामोडीBird Flu : चिकनचा भाव घसरला, 'बर्ड फ्लू'मुळे २५ हजार कोंबड्या मारण्याचे...

Bird Flu : चिकनचा भाव घसरला, ‘बर्ड फ्लू’मुळे २५ हजार कोंबड्या मारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Subscribe

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लू च्या संकटाने डोक वर काढल आहे. ठामे जिल्ह्यामध्ये जवळपास १०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाला आहे. या मृत पक्षांचे नमुने हे परीक्षणासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या पक्षांचा मृत्यू हा H1N1 एवियन इन्फ्लूएंजामुळे झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. एका पोल्ट्री फार्ममध्ये या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या पोल्ट्री फार्म परिसरातील जवळपास २५ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात बर्ड फ्लू चा उद्रेक झाल्यानंतर चिकन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. जवळपास ४ टक्क्यांनी शेअर्स घसरल्याची बाब आज समोर आली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या पशू विभागाला संक्रमण नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच मृत पक्षांचे नमुने हे परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ भाऊसाहेब डांगडे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील वेहोली या गावात १०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्लू ने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मृत्यू H1N1 एवियन इन्फ्लूएंजाने झाल्याचे समोर आले आहे.

येत्या दिवासंमध्ये नजीकच्या परिसरातील २५ हजार पक्षांना मारण्यात येईल असेही सीईओंनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या पशुपालन विभागाकडून इतर पक्षांमध्ये संक्रमण पसरू नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. केंद्रीय मत्स्य पालन आणि पशुपालन मंत्रालयानेही बर्ड फ्लू प्रकरणाबाबतचा अलर्ट जारी केला आहे.

- Advertisement -

वेंकिज इंडिया (Venkys India) या चिकन व्यवसायातील कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांनी आज घसरल्याचे समोर आले आहे. सकाळी १०. ३० वाजता २०७३ रूपये इतका शेअर खाली घसरला. त्याआधी गुरूवारी सायंकाळी २१५६ इतकी शेअर्सची किंमत होती. पण महाराष्ट्रातील बर्ड फ्लू च्या संकटामुळे या शेअर्सच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -