घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंना 'त्याचे' फळ मिळाले; भाजपाची सेनेवर टीका

उद्धव ठाकरेंना ‘त्याचे’ फळ मिळाले; भाजपाची सेनेवर टीका

Subscribe

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्याचील वाद आणखी वाढच चालला आहे. शिंदे गटातील आमदार व शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्याचील वाद आणखी वाढच चालला आहे. शिंदे गटातील आमदार व शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 ला केले. त्याचेच फळ त्यांना आता मिळाले. ज्याप्रकारे त्यांना लोकांचा विश्वासघात केला. तसेच, त्यांच्यासोबत आता घडते आहे”, अशा शब्दांत अजयकुमार मिश्रा यांनी टीका केली. (Bjp leader ajaykumar mishra slams shiv sena chief uddhav thackeray)

“उद्धव ठाकरे यांना त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचे फळ आहे. महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याचबरोबर सरकार बनवण्यात आले. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवले नव्हते”, असेही अजयकुमार मिश्रा यांनी म्हटले.

- Advertisement -

“आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत. भारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारीही करत नाही. आमच्यासाठी नागरिकांना सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे. जे पी नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते. त्यांनी जर असेच काम राहीले, सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत नाही पोचल्या तर निश्चितपणे याच नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल, असे ते म्हणाले होते”, असेही अजयकुमार मिश्रा यांनी म्हटले.

“ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. तीच लोक आमच्यावर आरोप करत आहेत. 8 वर्षात 1 लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती ज्यांच्याकडे अवैध होती. वावमार्गाने मिळवली होती तीच जप्त केली गेली. संजय राऊत ही किती बोलत होते, आता तर तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्याकडेही जप्ती केली. असेच लोक भाजपविरोधात बोलतात. पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचे सरकार, आमची पार्टी कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही”, असेही अजित कुमार मिश्रा यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी नाहीत, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुनावले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -