घरताज्या घडामोडीटोलनाक्यावर धिंगाणा घालणाऱ्या 'त्या' महिलेला ओळखत नाही, चित्रा वाघांनी झटकले हात

टोलनाक्यावर धिंगाणा घालणाऱ्या ‘त्या’ महिलेला ओळखत नाही, चित्रा वाघांनी झटकले हात

Subscribe

टोल नाक्यावर पैसे न देण्याच्या वादात एक राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्या टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टोल नाक्यावर पैसे न देण्याच्या वादात एक राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्या टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये या महिलेने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे नाव घेतले आहे. मात्र, या व्हिडीओवर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी त्या महिलेला ओळखत नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले असून, या महिलेचा शोध घेऊन तिच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (BJP Leader Chitra Wagh Slams That Women Who Abuse To Toll Worker Women)

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक महिला टोल नाक्यावर पैसे देण्यावरून टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत आहे. तसेच, तीनपट कामवाल्या असे त्या टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांना ही महिला म्हणत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

- Advertisement -

याप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर या व्हिडीओतील महिलेशी आपला संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच, “गेल्या दोन दिवसांपासून एक viral होत असलेला व्हिडीओ पाहण्यात आलाय… ज्यात १ महिला गाडीत बसून (बहुतेक टोल नाक्यावर असावी) अत्यंत अश्लाघ्य भाषेत कुणाशी तरी बोलतांना दिसतीये… त्या बाईने माझ्या नावाचा उल्लेख त्यात केलाय”, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“बरेच फोन /मॅसेज आले मी त्या बाईला ओळखते किंवा काय… मला सगळ्यांना सांगायचंय ही बाई कोण मला माहीत नाही… मी या बाईला ओळखतही नाही… या बाई आमच्या भाजपा पक्षाच्या पदाधिकारी/कार्यकर्ता नाहीत आणि माझी समर्थक असण्याचा तर प्रश्नचं नाही… यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडीओतील महिलेला शोधून तिच्यावर तात्काळ कारवाई करावी”, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या ‘टायगर रिजर्व्ह प्रकल्प’ भेटीवर काँग्रेसचा सवाल; म्हणाले, ‘इंदिरा गांधी…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -