Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मविआ सरकारने वेळकाढूपणा बंद करून राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भरा'

‘मविआ सरकारने वेळकाढूपणा बंद करून राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भरा’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजून याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. आता तरी महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करून राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी पत्रकाद्वारे केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या गुणवंत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरणार, अशी घोषणा केली होती. मात्र ३१ जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत, असे भांडारी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि या जागा भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. आघाडी सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नये, असेही भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.


हेही वाचा – ‘वेळ आली तर ‘सेनाभवन’ फोडू’, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त विधान


- Advertisement -

 

- Advertisement -