घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा खालच्या दर्जाची - नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा खालच्या दर्जाची – नारायण राणे

Subscribe

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर काल ज्याप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कुणीही असे भाषण केलेले नाही. अतिशय खालच्या दर्जाची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरली. राज्यपालांच्या भाषणात उपस्थित केलेल मुद्दे आणि विकासाच्या बाबींवर एकही वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेले नाही, असा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन महा विकास आघाडीच्या सरकारवर टीका केली.

भाजप-शिवसेनेची निवडणूकपुर्व युती होती. मात्र निवडणुकीनंतर भाजप सत्तेत नाही. युतीला १६१ जागा मिळाल्या मात्र युती ऐवजी आघाडी सत्तेत आली. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. ही आघाडी फक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून केली गेली आहे. सत्तेसाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी राज्यातील जनता, पक्षाची विचारधारा पणाला लावली गेली आहे, असा आरोपही राणे यांनी केला.

- Advertisement -

सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचे पाच दिवस पुर्ण झाले आहेत. या पाच दिवसात महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतलेला नाही. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरी सरकारने सर्व मंत्री नेमलेले नाहीत. खातेवाटप व्यवस्थित केले नाही. राज्याचे प्रश्न ज्याला माहीत आहेत, ते सोडविण्याची ज्यामध्ये धमक आहे, असा जबाबदार मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. नाहीतर हे राज्य रसातराळा जाईल, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

नारायण राणेंनी भर पत्रकार परिषदेत आपल्या संपादकांना झाडले

भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या प्रहार दैनिकात आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वार्तांकन करण्यात आल्यामुळे राणे चांगलेच संतापले होते. आज नागपूर येथे भर पत्रकार परिषदेतच त्यांनी प्रहारच्या संपादकांना झापले. ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रक्षोभ!’ या शीर्षकाखाली प्रहारच्या पहिल्या पानावर बातमी छापून आलेली आहे. या बातमीवर नाराजी व्यक्त करत राणे म्हणाले की, आपली भूमिका ही कायद्याच्या बाजूने आहे. मग प्रक्षोभ कसा काय म्हणायचा? प्रहार दैनिकाची भूमिका ही सरकारच्या बाजूनेच असली पाहीजे, असा इशाराच यावेळी राणे यांनी दिला. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे सुरु असल्याकारणाने हा सर्व प्रकार ऑन एअर गेला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -