“पुष्पाचे मुंबईत शूटिंग झाले असते तर…”; भाजपाचा महापालिकेवर निशाणा

मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईत खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. मात्र, तरीही पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने खड्डे निर्माण होतात.

Pushpa

मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असून, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईत खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून केले जाते. मात्र, तरीही पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने खड्डे निर्माण होतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर भाजापाने महापालिकेवर निशाणा साधाल आहे.

दाक्षिणात्य चित्रपट पुष्पामधील प्रसिद्ध श्रीवल्ली या गाण्याचा वापर करत एक अनिमेशमन असलेले व्हिडिओ भाजपाने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, हा व्हिडिओ शेअर करत “पुष्पा चे मुंबईत शूटिंग झाले असते तर…”, “पुष्पा बच गया!”, अशा शब्दांत हल्लाबोल केला.

भारतीय जनता पार्टी पक्षाणे आपल्या भाजपा मुंबई या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे दाखवण्यात आले आहे. तसेच, त्यावर पुष्पा श्रीवल्ली या गाण्यावर चित्रीकरण करताना दाखवला आहे. मात्र चित्रकरणादरम्यान गाण्यावर नाचत असताना खड्ड्यात तोल जाऊन पुष्पा पडताना दाखवण्यात आला आहे. तसेच, या चित्रपटातील पुष्पाचा फेमस डायलॉग “मे झुकेगा नही…” हा उच्चारण्यात आला आहे. याशिवाय, या व्हिडिओच्या शेवटी “BMC के सत्ताधारियों के राज मे झुकेगा नही गिरेगा..”, असा टोलाही लगावण्यात आला आहे.

येत्या काळ्यात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी तयारीला जोरदार सुरूवात केली आहे. महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेतल्या जात आहेत. अशातच मुंबईच सध्या पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे भाजपाने महापलिकेवरील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान सध्या महापालिकेत कोणाची सत्ता अथवा कोणताही नगरसेवक नाही आहे. महापालिकेता कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र गेल्या २५ हून अधिक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाने हा टोला शिवसेनेवर हाणाला असे बोलले तर वावगे ठरणार नाही.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भेटणार राज ठाकरेंना, तर्कवितर्कांना उधाण