घरक्राइमऑनलाईन क्लासमध्ये जुळले मैत्रीचे बंध; क्लासचालकाने गुंगीचे औषधे देवून तरुणीवर केला बलात्कार

ऑनलाईन क्लासमध्ये जुळले मैत्रीचे बंध; क्लासचालकाने गुंगीचे औषधे देवून तरुणीवर केला बलात्कार

Subscribe

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; राजस्थानमधील तरुणावर गुन्हा दाखल

ऑनलाईन खासगी क्लास घेणार्‍या मार्गदर्शकाने तरुणीला मैत्रीच्या जाळ्यात ओढत तिला शीतपेयातून गुंगीकारक औषध पाजून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपीने तरुणीचे अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने म्हसरुळ पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित विवेक योगनारायण बोहरा(रा. करोलिया मार्ग, गीताभवनजवळ, जैतारण, जि. ब्येवार, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, म्हसरुळ परिसरातील तरुणी शिक्षण घेत असताना तिने ऑनलाइन खासगी क्लास जॉईन केली. व्हाटस्अ‍ॅपच्या माध्यमातून क्लास सुरु असताना संशयित विवेकने तरुणीशी शिक्षणासह अन्य अवांतर बोलणे सुरु केले. त्यातून दोघांमध्ये मैत्री वाढत गेली. विवेकने तिचा विश्वास संपादन केले. तो काही दिवसांपूर्वी तरुणीला राजस्थानवरुन नाशिकमध्ये आला. त्याने पीडितेशी नियमित बोलणे केले. दोघे जण दोघे मुंबई, सोमेश्वर, पुणे, गुजरात आदी ठिकाणी फिरायला गेले. त्यानंतर दोघे नाशिकमध्ये आले. संशयित विवेकने पीडितेच्या घरात असताना कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला पाजले. काही मिनिटांत तरुणी बेशुद्ध झाली. तिची शुद्ध हरपल्याचे लक्षात येताच विवेकने तिच्यावर बलात्कार करत अश्लिल व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केले आणि तो निघून गेला. काही तासांनी विवेकने तरुणीचे अश्लिल व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅपवर टाकून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या पायाखालील वाळूच सरकली. मोबाईल लोकेशन व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे म्हसरुळ पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -