घरक्राइमभावाने केली अल्पवयीन बहिणीची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

भावाने केली अल्पवयीन बहिणीची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Subscribe

सलग चार ते पाच दिवस भावाने मारहाण केल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे.

सलग चार ते पाच दिवस भावाने मारहाण केल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. (Brother killed minor sister, shocking reason came to light) अल्पवयीन बहिणीच्या गुप्तांगातून रक्त येत असल्याने भावाने तिला चार ते पाच दिवस बेदम मारहाण केली. त्यानंतर या घटनेत त्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत मृत पावलेली मुलगी ही 12 वर्षांची असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली असून मृत झालेल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपी भावाने तिला मारहाण केली असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! सोन्याच्या खाणीला लागली आग, 27 मजुरांचा दुर्दैवी अंत

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव होऊ लागल्याने होऊ लागल्याने तिला असे का होत आहे? याबाबत आरोपी भावाकडून विचारणा करण्यात आली. पण त्यावेळी या मुलीने तिच्या भावाला याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. म्हणून संतापलेल्या या भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. या संशयातूनच त्याने तिला चार ते पाच दिवस बेदम मारहाण केली. त्याने तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.

तर या मारहाणीतच तिचा मृत्यू झाला. यानंतर भावाने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ज्यानंतर या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भाऊ ब्रिजेश शुक्ला याला अटक केली आहे. तर या घटनेचा अधिक तपास उल्हासनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरित हळहळ व्यक्त करत असून आरोपी भावासाठी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राज्यात एकीकडे लहान मुलींच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता राज्यातील बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. तर दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली असून ही आकडेवारी गंभीर आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 18 ते 25 या वयोगटातील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -