आदित्य ठाकरे राजकीय नेते असल्यासारखे वागताहेत…; चंद्रशेखर बावनकुळेंचे उपहासात्मक भाष्य

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यांमुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशातच आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्यपाल बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

chandrashekhar bawankule
संग्रहीत छायाचित्र

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यांमुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशातच आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्याकडून राज्यपाल बदलण्याची मागणी करण्यात आली ज्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचा राज्यपाल बदलण्याची मागणी केली आहे. याआधी सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. ती मागणी आजही ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे नेहमीच राज्यपाल बदलण्यात यावे, असे वक्तव्य करत असतात. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपहासात्मक भाष्य केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी याआधी राज्यपाल बदलण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांना केले होते. परंतु भाजपकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना आता थेट राज्यपाल बदलण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे राज्यपाल बदलण्याचा अधिकार ना मला आहे. ना आदित्य ठाकरे हे राज्यपाल बदलू शकतात.केंद्रीय व्यवस्थेमधील हा विषय आहे. आदित्य ठाकरे हे सध्या राजकीय नेते झाल्यासारखे वागत आहेत. ज्यामुळे यावर उत्तर देणे हे योग्य नाही असे भाष्य बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं नवं आव्हान, म्हणाले, येत्या अधिवेशनात….

मंगळवारी (ता. 7 फेब्रुवारी) रात्री आदित्य ठाकरेंच्या वैजापूर येथील सभेनंतर त्यांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत केलेल्या अक्षम्य चुकेमुळे असे घडल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबतचे पत्र सुद्धा दानवेंनी पोलीस महासंचालकांना पाठवले आहे.

दरम्यान, याबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “विरोधी पक्षाचा नेता त्यांच्याबद्दल वाईट वागणे किंवा त्यांच्याविरोधात गुंडागर्दी करणे, तसेच रस्त्यावर त्यांच्या विरोधात अशाप्रकारे प्रदर्शन करणे हे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खपवून घेणार नाहीत. त्यामुळे याची चौकशी करून दोषींविरोधात येईल.”