घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक-पुणे रेल्वेमार्गात बदल; जिल्हा प्रशासनापुढे नवा पेच

नाशिक-पुणे रेल्वेमार्गात बदल; जिल्हा प्रशासनापुढे नवा पेच

Subscribe

१७ पैकी ११ गावांतून जाणार्‍या मार्गात बदल

नाशिक : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच आता जिल्ह्यातील १७ पैकी ११ गावांतून जाणार्‍या मार्गात बदल केला जाणार आहे. महारेलने जिल्हा प्रशासनाला तसे कळविले आहे. त्यामुळे संपादीत करण्याच्या जमिनींचे गट बदलणार असल्याने जिल्हा प्रशासनापुढील पेच वाढला आहे. या प्रकल्पासाठी लवकरात लवकर भूसंपादन करण्याचे आव्हान या नव्या पेचामुळे अधिक वाढले आहे.

या रेल्वे प्रकल्पासाठी सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी, नांदुर शिंगोटे, चास व नळवाडी गावांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक तालुक्यातील देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसारी या गावांमधील जमिनीदेखील संपादीत करण्यात येणार आहेत. सिन्नर तालुक्यातील अनेक गावांतील जमिनींचे जिरायती, हंगामी बागायती व बागायती अशा वर्गीकरणानुसार दरही जाहीर करण्यात आले आहेत. काही गावांत शेतकर्‍यांच्या जमिनींची खरेदी प्रक्रीयादेखील जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. महारेलने पूर्वी सादर केलेल्या डिमार्केशननुसार त्या-त्या गावांमध्ये जमिनींचे कोणते गट संपादीत करायचे हे जिल्हा प्रशासनाला स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेतकर्‍यांकडे जमिनी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. असे असताना आता सिन्नर तालुक्यातील १७ पैकी ११ गावांत महारेलने डिमार्केशनबाबत बदल सूचविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -