घरमहाराष्ट्रनाशिक...म्हणून पूजनाचा प्रश्न येतोच कुठे, छगन भुजबळांनी दिले 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण

…म्हणून पूजनाचा प्रश्न येतोच कुठे, छगन भुजबळांनी दिले ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

Subscribe

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. माझे मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देशाच्या विरुध्द बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. पण, मी इतकेचे म्हटले की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवले आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. सरस्वतीने आपल्याला काही शिवकवले नाही, त्यामुळे पूजनाचा प्रश्न येतोच कुठे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 छगन भुजबळ काय म्हणाले होते –

शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाळासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही. ज्यांना शिकवले नाही. असेलचे शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळाले, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगरे नंतर बघूया, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -