घरमहाराष्ट्र19 बंगल्यांच्या गूढ रहस्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

19 बंगल्यांच्या गूढ रहस्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरपंच सांगतात की, कोर्लई गावात 19 बंगले नाहीत. तर मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्याकडून मालमत्ता कर हा बंगल्यांसाठी भरण्यात येतो. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी बंगल्यांची वास्तविकता तपासण्यासाठी आज कोर्लई गावात आलो होतो.

मुंबईः 19 बंगल्यांचे गूढ रहस्य अधिक वाढत चाललंय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यासंदर्भात स्पष्टता करावी लागणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणालेत. किरीट सोमय्यांनी आज रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. रश्मी उद्धव ठाकरेंचे 19 बंगले कसे काय अदृश्य करण्याचा काय प्लॅन त्यांनी घडवला. तो का घडवला आणि आता त्या बंगल्याची स्थिती काय आहे. ते चार दिवसांपूर्वी रात्री पावणे तीनला आले होते की 2.50 वाजता आले होते. त्यांनी ते 19 बंगले स्वतः उडवलेत की काय?, मी राज्य सरकारला आवाहन करतो, त्यांनी मिसेस मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले उडवले. 5 कोटी 18 लाखांचे हे बंगले त्यांनी कोणत्या कायद्यांतर्गत उडवले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरपंच सांगतात की, कोर्लई गावात 19 बंगले नाहीत. तर मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्याकडून मालमत्ता कर हा बंगल्यांसाठी भरण्यात येतो. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी बंगल्यांची वास्तविकता तपासण्यासाठी आज कोर्लई गावात आलो होतो. ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात दोन्ही ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यात आल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. ग्रामसेवकांनी येत्या काही दिवसांमध्ये माहिती देण्याचे आश्वासन दिलेय, तर पोलीस अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

दोन्ही ठिकाणी प्रशासनाकडून मदत मिळाल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले. पण बंगले गायब झाल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी पत्नीशी गद्दारी केली आहे का? असाही सवाल सोमय्यांनी केलाय. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला आम्ही न्याय मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी हे बंगले पाडले आहेत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कागदोपत्री बंगले पाडले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केलीय.

दोन्ही ठिकाणी प्रशासनाकडून मदत मिळाल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितले. पण बंगले गायब झाल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी पत्नीशी गद्दारी केली आहे का? असाही सवाल सोमय्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला आम्ही न्याय मिळवून देणार असल्याचे ते म्हणालेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी हे बंगले पाडले आहेत का? असाही सवाल त्यांनी केला होता.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -