घरताज्या घडामोडीमंदिर बंद असताना रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते आता इतर वाजत आहेत, मुख्यमंत्र्यांचा...

मंदिर बंद असताना रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते आता इतर वाजत आहेत, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर टोला

Subscribe

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी लिहिलेल्या कोविड वॉरियर या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोंग्यांवरुन सुरु असलेल्या विरोधकांच्या हंगामावर टीका केली आहे. वर्षभरापूर्वी राज्यात मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. परंतु आता वेगळे भोंगे वाजत आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप मनसेवर आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड वॉरियर या पुस्तकाचे प्रकाशन करताना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. मागील दोन वर्ष आपल्या आयुक्तांचा चेहरा विनामास्क पाहिला नव्हता. मध्ये अशी परिस्थिती झाली होती की, आपल्याला काही आपल्या हालचाली बदलाव्या लागल्या होत्या. हसायचे झाले तर अंग हालवून मी हासतोय असं दाखवावं लागत होते. खांदे उडवतोय म्हणजे मी हसतो आहे. नेमकं काय बोलायचे या सगळ्या काळावर हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा हा काळ इतिहास जमा होईल तेव्हा आपण काय करत होतो. याची डॉक्युमेंटरी केली पाहिजे. आजच या प्रती काही लोकांना घरपोच पाठवल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisement -

साधारणता कोरोना काळात सर्व प्रार्थना स्थळे बंद होती आणि फक्त रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजत होते. तेव्हा रुग्णवाहिका मिळत नव्हत्या, डॉक्टर्स वाढवले पाहिजेत. औषध उपचार वेळेत मिळत नव्हते. अजून कोरोनावर औषध आले नाही. परंतु आपण कोरोना मॅनेज करु शकतो त्यावरील उपचार नाही.

मुख्यमंत्रीच गर्भळीत होऊन बसला असता तर..

फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची अचानक वाढ झाली. कोविड भयंकर असल्याचे समोर आले. तेव्हा फील्ड हॉस्पिलची गरज होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जर एका टीमला काम दिले तर त्याचा कॅप्टन मजबूत असायला पाहिजे. कॅप्टन मजबूत नसेल तर टीम कशी खेळणार. मी टीमवर माझा आत्मविश्वास होता आणि ते काम मी केले. जर मुख्यमंत्रीच गर्भगळीत होऊन बसला असता तर आख्खं राज्य बसलं असत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -