नाशिकमध्ये कोरोनाचा विस्फोट

उच्चांक : ४०९९ नवे रुग्ण

covid 19 mask
कोरोना मास्क

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात उच्चांकी ४ हजार ९९ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक शहर २ हजार 90, नाशिक ग्रामीण 1 हजार 7०6, मालेगाव २३१ आणि जिल्हाबाहेरील ७२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ४, नाशिक ग्रामीण ४ आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ९९२ रुग्ण बाधित आढळून आले. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात सध्या २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने दिवसभरात २ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात संशयित २ हजार ७४९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय १३, नाशिक महापालिका रुग्णालये २ हजार ५२२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ५, मालेगाव रुग्णालय ५६ आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात १५३ रुग्ण दाखल झाले आहेत.