घरक्राइमशेवगावमध्ये दलित कुटुंबाला मारहाण, 11 जणांविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

शेवगावमध्ये दलित कुटुंबाला मारहाण, 11 जणांविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या सुळे पिंपळगावमध्ये दलित कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या सुळे पिंपळगावमध्ये दलित कुटुंबाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दलित कुटुंबियांना मारहाण करून यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना देखील मारण्यात आल्याचे तक्रारीत सागण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावामधील 11 जणांविरोधात अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कायदा (एट्रोसिटी) व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली आहे. परंतु 48 तास उलटून गेल्यानंतर देखील या प्रकरणात अद्यापही एकाला देखील अटक करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. (Dalit family was beaten up in Shevgaon, case under POCSO Act was registered against 11 people)

हेही वाचा – जाळपोळ-तोडफोडीच्या ‘नाशिक पॅटर्न’मुळे शहरात दहशत; विहितगावात गाड्यांची जाळपोळ

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंबिय हे सुळे पिंपळगावमध्ये राहण्यास असून या गावातील गावठाण विभागात शेती करत होते. यावेळी त्यांच्या शेजारील गटनंबर असलेल्या व्यक्तींनी टाकलेला उकिरडा व सरपण उचलून घे असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. ज्यानंतर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात या कुटुंबाला आणि लहान मुलांना मारहाण करत जातीयवाचक शिवीगाळ करण्यात आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी भास्कर रावसाहेब मासाळ, आजिनाथ रावसाहेब मासाळ, प्रकाश रावसाहेब मासाळ गंगाधर रावसाहेब मासाळ, गणेश अभिमान मासाळ, रमेश मोतीराम माने, प्रताप रोहिदास मासाळ, महेश अभिमान मासाळ, भाऊसाहेब मारुती मासाळ, संदीप किसन मासाळ, नानासाहेब देवराम माळी यांच्या विरोधात रजिस्टर नंबर 712/23 भादवी कलम 354 (अ) 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच बाललैंगिक अत्याचार (पॉक्सो) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील सर्व आरोपी घटनेच्या दोन दिवसांनंतर देखील फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

तर, सदर दलित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, तसेत या घटनेची समाजकल्याण खात्याने दखल घ्यावी, या कुटुंबीयांवर दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन तक्रार दाखल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशा अनेक मागण्यांसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पँथर रिपब्लिकन पार्टीचे राज्य संघटक व माजी जि.प. सदस्य पवनकुमार साळवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -